'दि टॉपर्स अकॅडमी पंढरपूर' ची स्थापना

15 जून 1998 रोजी त्यांचे चिरंजीव श्री गणेश धांडोरे सर हे वयाच्या अठराव्या वर्षीच या क्षेत्रात उतरले व त्यांनी क्लासचे दि टॉपर्स अकॅडमी पंढरपूर असे नामकरण केले. गणेश धांडोरे सर हे 1995 साली एसएससी बोर्डामध्ये गुणवत्ता यादीत विसावा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले होते. बारावी झाल्यानंतर मेडिकल व इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश मिळत असतानादेखील त्यांनी शिक्षकी पेशाच्या आवडीमुळे बीएस्सी ला प्रवेश घेऊन क्लासच्या क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला वडील व बहीण यांच्या मदतीने लवकरच क्लासच्या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवला. त्याकाळात चौथी व सातवी स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आणण्याचे काम त्यांनी केले.

त्याच बरोबर दहावी बोर्ड परीक्षेमध्येही दर वर्षी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्यापुढे नेण्याची किमया त्यांनी साधली.